Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : १३ नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : १३ नोव्हेंबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :- दूरदृष्टीकोन उपयोगी पडेल. दुसर्‍यांच्या डावपेचांचा अंदाज येईल. भावनेत अडकल्यामुळे सौम्य शब्दात दुसर्‍याला समज घ्यावी लागेल.

वृषभ :- विरोध पत्कारून कामात मग्न व्हावे लागेल. जिद्द सोडू नका.

- Advertisement -

मिथुन :- प्रकृति अस्थिर राहिल. दुसर्‍यांच्या बोलण्याचा विचार कराल. संबंध तुटण्याची शक्यता वाटेल.

कर्क :- जीवनसाथीच्या मदतीमुळे अवघड कामात यश मिळवता येईल. प्रवासात नविन परिचय होईल.

- Advertisement -

सिंह :- वागण्या-बोलण्यात अहंकार ठेवल्यास वाद होतील. संबंध सुधारण्या ऐवजी बिघडतील.

कन्या :- मुलांच्या भवितल्या विषयी विचार कराल. खर्च होईल. कौटुंबिक वाटाघाटीत वर्चस्व राहिल.

तूळ :- यश मिळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करावे लागतील. तुमच्या मनात विचारांचे चक्र चालू राहिल.

वृश्चिक :- दुसर्‍याचे डावपेच लक्षात येतील परंतु ते उघड करू नका. त्यातचे तुमचे यश दडलेले असेल.

धनु :- फायदेशिर योजना समोर येईल. कामासाठी भटकंती होईल. परंतू आत्मविश्वास वाढेल.

मकर :- उद्योगी स्वभावाचा फायदा होईल. वरिष्ठ कौतुक करतील. धंद्यात, शेअर्समध्ये लाभ होईल.

कुंभ :- निर्णय घेतांना घाई करू नका. चूक होण्याची शक्यता आहे. प्रवासात महत्वाची वस्तू सांभाळा.

मीन :- तडजोडीमुळे नुकसान टळेल. तुमच्या कामाचा सुगावा इतरांना लागू देऊ नका.

- Advertisement -