Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : १६ ऑक्टोबर २०१८

आजचे भविष्य : १६ ऑक्टोबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :– धाडस वाढेल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. डावपेच टाकता येईल. भेट घेण्यास व चर्चा करण्यात यश मिळेल.

वृषभ :- धंदा मिळेल. किरकोळ वाद भागिदारा बरोबर होऊ शकतात. थकवा वाटेल. धावपळ होईल.

- Advertisement -

मिथुन :- वरिष्ठांना संभाळून घ्यावे लागेल. धंद्यासाठी नवा विचार सुचेल. मित्रांचा सहवास मिळेल. प्रवासात ओळख वाढेल.

कर्क :- प्रतिष्ठा टिकवता येईल. नोकरवर्गाला त्रास धंद्यात होऊ शकतो. कोर्ट केस मध्ये बोलतांना काळजी घ्या.

- Advertisement -

सिंह :- घरातील मतभेद मिटवता येतील. वरिष्ठांना तुमचे मत पटवून देता येईल. तुमचा दिवस चांगला असेल.

कन्याः- नित्य नियमाच्या क्रम व्यवस्थित पार पाडता येईल. अधिकाराचा उपयोग करून घेता येईल.

तूळ :- आजचे काम आजच करून घ्या. धंधा मिळेल. स्पर्धा आकर्षक झाल्याने उत्साह वाढेल. प्रवास घडेल.

वृश्चिक :- नवा विचार धंद्यात उपयोगी पडेल. नावलौकिक मिळेल. वरिष्ठ व सहकारी तुमची मदत करतील.

धनु :-आक्रमक पवित्रा राजकीय-सामाजिक क्षेत्रात घेता येईल. धंधा मिळेल. चांगले पदार्थ कराल.

मकर :- आजच्या दिवसात मन उदास राहिल. कोणताही क्षेत्रात मत व्यक्त करतांना काळजी घ्या. फायदा होईल.

कुंभ :- कामाचा व्याप सांभाळून घेता येईल. आप्तेष्ठांच्या भेटीत महत्वाची बातमी मिळेल. खरेदी कराल.

मीन :-तुमचे वर्चस्व सामाजिक क्षेत्रात वाढेल. धंद्यात चांगला फायदा होईल. पाहुण्यांच्यासाठी खर्च करावा लागेल.

- Advertisement -