आजचे भविष्य : सोमवार १७ डिसेंबर २०१८

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- अपयशाने न खचता तुम्हाला तुमच्या कार्यात प्रयत्न करावे लागतील. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ :- कोर्टकचेरीच्या कामात यश मिळवता येईल. धंद्यात मदत घेऊन त्याचा विस्तार करू शकाल.

मिथुन :- दुसर्‍यांचे दोष दाखवून आपली हुशारी ठरत नाही. स्वतःच्या कामावर लक्ष द्या. प्रगति करा.

कर्क :- ठरविलेले काम वेळेत पूर्ण होईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. स्पर्धेत प्रगति होईल.

सिंह :- धावपळ केल्याने थकवा वाटू शकतो. मन खंबीर ठेवा. तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न होईल.

कन्या :- आजचे काम आज करणे चांगले असते. नविन ओळख होईल. घरात आनंदी रहाल.

तूळ :- कामाचा व्याप वाढेल. दुसर्‍यावर अवलंबून राहू नका. स्वतःच लक्ष द्या. रस्त्याने सावधपणे चाला.

वृश्चिक :- तुमचा कामाचा उत्साह वाढेल. वेळेला महत्व दिल्यास जास्त कामे करू शकाल. आळस करू नका.

धनु :- तुमचा दबदबा निर्माण करता येईल. धंद्यात किरकोळ अडचणी येऊ शकतात. वरिष्ठांची मर्जी वाढेल.

मकर :- महत्वाचा निर्णय घेताना योग्य विचार करा. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. धंदा वाढेल.

कुंभ :- धंद्याला मोठे स्वरूप देण्याचे ठरवाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. केस जिंकाल.

मीन :- मनाची द्विधा अवस्था होईल. धंद्यात व्यवहार चोख ठेवा. पदाधिकार मिळू शकेल.