मेष :- मुलाच्या सहकार्याने तुमचा कामाचा व विचारांचा भार हलका होईल. प्रवासात नवीन परिचय होईल. चर्चा सफल होईल.
वृषभ :- विचारांचा व मनाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. आश्वासन मिळेल. गैरसमज होणार नाही याची काळजी घेता येईल.
मिथुन :- जीवनसाथीची प्रगती तुम्हाला आनंद देणारी असेल. आप्तेष्ठांच्या भेटीगाठी होतील. मनाची एकाग्रता साधता येईल.
कर्क :- ठरविलेल्या कामात प्रयत्नाने यश मिळवता येईल. मनाची द्विधा अवस्था टाळण्याचा प्रयत्न करता येईल. देवदर्शन होईल.
सिंह :- तुमचा आत्मविश्वास वाढेल. सहकारी वर्गाशी चांगली, सकस चर्चा करता येईल. प्रतिष्ठा मिळेल.
कन्या :- तुमचा मुद्दा इतरांना पटणे कठीण आहे. तुम्ही नाराज व्हाल. उदास वाटेल. खर्च वाढेल.
तूळ :- अध्यात्मिक क्षेत्रात मन रमेल. तुटलेले नाते नव्याने जुळवता येईल. खूशखबर मिळेल.
वृश्चिक :- अंदाज बरोबर येतील. व्यवसायातील तोटा भरून काढता येईल. आत्मविश्वास व उत्साह वाढेल.
धनु :- निश्चयपूर्वक एखादे काम करता येईल. महत्त्वाच्या व्यक्तीची भेट घेता येईल. जुने येणे वसूल करा. धंदा वाढेल.
मकर :- अपेक्षा वाढतील. प्रकृतीची तक्रार निर्माण होईल. खाण्यापिण्यावर बंधन घालावे लागेल. मन विचलित होईल.
कुंभ :- वरिष्ठांशी एकमत होईल. मनावरील दडपण कमी होईल. महत्त्वाची बोलणी करण्यात यश मिळेल.
मीन :- तुमचा विचार तुमचा मुद्दा कौशल्याने पटवून द्यावा लागेल. रागाच्या भरात कुणाचा तरी अपमान तुमच्याकडून होण्याची शक्यता आहे.