मेष :- महत्वाच्या कामात यश मिळेल. अडचणीवर मात करता येईल. अचानक एखादी चांगली घटना मनावरील ताण दूर करेल. धंदा वाढेल.
वृषभ :- व्यवसायात नवा पर्याय शोधता येईल. समस्या कमी करण्याचा प्रयत्न करा. नविन परिचयातून नवा विचार तुम्हाला मिळेल.
मिथुन :- ईश्वरी चिंतनाने मन स्थिर होईल. दुसर्याच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे लागेल. धंद्यात फायदा होईल. थकबाकी वसुल करा.
कर्क :- जीवनसाथीच्या सहकार्याने अडचणी कमी होतील. दगदग वाढेल. धंद्यात क्षुल्लक वाद वाढवू नका. नविन परिचय होईल.
सिंह :- मन उदास राहिल. उशिर झाला तरी तुमचे काम होण्यास वरिष्ठांची मदत मिळेल. राग वाढवू नका.
कन्या :- एखादी चर्चा वादाकडे झुकण्याची शक्यता आहे. घरातून सहाय्य मिळेल. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात मतभेद होतील.
तूळ :- मनाची द्विधा अवस्था होईल. ईश्वरी चिंतनाने आत्मविश्वास वाढेल. मान-सन्मान योग येईल. स्पर्धा जिंकता येईल. शुभ संकेत मिळेल.
वृश्चिक :- गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. कामाचा व्याप वाढेल. प्रवासात काळजी घ्या. धंद्यात अचानक तुमचा अंदाज चुकू शकतो.
धनु :- ठरविलेल्या कामात यश मिळेल. भेटीत यश मिळेल. स्पर्धा जिंकता येईल. दर्जेदार परिचय होईल. व्यवसायासाठी महत्वाचा निर्णय घेता येईल.
मकर :- रेंगाळलेली काम पूर्ण करू शकाल. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. धंद्यातील त्रुटी कमी करता येतील. जनसंपर्क वाढेल.
कुंभ :- घरात क्षुल्लक वाद होऊ शकतो. खाण्याची काळजी घ्या फार गर्दीत जाण्याने त्रास होईल. वरिष्ठांना कामात मदत करावी लागेल.
मीन :- संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. थोरा-मोठ्यांचे बरोबर नम्रतेने वागा. कायद्याचे पालन करा. महत्वाची वस्तु जागेवर ठेवा.