घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

Subscribe

मेष :- विरुद्धलिंगी व्यक्तीचा डाव ओळखा. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. धंद्यात मोठा फायदा होऊ शकतो.

वृषभ :- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. कोर्टकेसमध्ये नम्रतेने बोला. समस्या वाढणार नाही.

- Advertisement -

मिथुन :- दुसर्‍यांच्या रागाचा तुम्हाला त्रास होईल. प्रेमाच्या व्यक्तीला सांभाळून घ्या. स्पर्धेत चमकाल.

कर्क :- आजचे काम आजच करणे याला तत्परता म्हणतात. नावलौकिक मिळेल. आवडते पदार्थ मिळतील.

- Advertisement -

सिंह :- क्षुल्लक गोष्टींच्या बोलण्याचा मनावर ताण येईल. दडपण वाढेल. कामाचा व्याप वाढेल.

कन्या :- धंद्यात वाढ होईल. वरिष्ठांबरोबर गोड बोला. तुमचा महत्त्वाचा प्रश्न सोडवा.

तूळ :- तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा-साहित्यात चमकाल.

वृश्चिक :- विचारांना दिशा मिळेल. मोठ्या लोकांची मदत धंद्यात घेता येईल. नवीन ओळख होईल.

धनु :- मुलांची प्रगती पाहून सुख वाटेल. नवीन खरेदी कराल. मोठे लोक मदत करतील.

मकर :- आजचे काम उद्यावर टाकू नका. मान-प्रतिष्ठा मिळेल. कठीण काम करून घेता येईल.

कुंभ :- तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. आवडते काम करण्यात मन रमेल.

मीन :- जुना वाद मिटवता येईल. नवीन धंदा मिळेल. धंद्यात अंदाज बरोबर येईल. प्रतिष्ठा मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -