घरभविष्यआजचे राशीभविष्यराशिभविष्य : मंगळवार, २३ जुलै २०१९

राशिभविष्य : मंगळवार, २३ जुलै २०१९

Subscribe

मेष :- तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून गैरअर्थ काढला जाईल. सामाजिक क्षेत्रात आरोप येईल. राग आवरा.
वृषभ :- मोठे काम करून घ्या. भेट यशस्वी होईल. धंद्यात फायदा होईल. थकबाकी वसूल करा.
मिथुन :- तुमचा प्रभाव वाढेल. प्रगतीची नवीन संधी तुमच्या कामात मिळेल. धंदा वाढेल.
कर्क :- स्पर्धेत अव्वल रहा. नवीन कल्पना कला क्षेत्रात सुचेल. प्रेमाला चालना मिळेल.
सिंह :- प्रवासात नवीन ओळख झालेल्या व्यक्तीशी जपून वागा. व्यवहारात फसगत होईल.
कन्या :- घरगुती तणाव कमी होईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. प्रेमात यश मिळेल.
तूळ :- कामाचा व्याप वाढेल. तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.
वृश्चिक :- आर्थिक व्यवहार आजच करा. ओळखीचा उपयोग करून घ्या. शेअर्सचा अंदाज घेता येईल.
धनु :- वरिष्ठांचा मर्जीच्या बाहेर जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. दगदग जास्त वाटेल.
मकर :- तुमचा प्रभाव सर्वत्र वाढेल. लोकप्रियता मिळेला. घर, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल.
कुंभ :- रेंगाळलेले काम करून घ्या. सहनशीलता ठेवल्यास कामात यश येईल. वाहन दुरुस्त कराल.
मीन :- महत्त्वाची कामे करून घ्या. वरिष्ठांची भेट घ्या. तुमची मागणी त्यांना सांगा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -