राशीभविष्य : मंगळवार, २४ मार्च २०२०

राशीभविष्य

मेष – तुमचा विचार इतर लोक पटवून घेणार नाही. समाजकार्यात तुमच्या टीका होऊ शकते. जवळचे लोक मदत करतील.

वृषभ – महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. घरातील तणाव वाढवू नका. खाण्याची काळजी घ्या. यश मिळेल.

मिथुन – ठरविलेले काम वेळेत पूर्ण करता येईल. नवीन ओळखीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा जिंकल.

कर्क – तणाव कमी करता येईल. धंद्यात तडजोड करा. काम सोडू नका. सौम्य धोरण प्रतिष्ठा वाढवेल.

सिंह – प्रतिष्ठेचा प्रश्न करून वाद वाढवू नका. टिका होईल. प्रकृतिकडे लक्ष द्या. दगदग होईल.

कन्या – घरगुती वाटाघाटीमध्ये तुमचा अवमान होऊ शकतो. तुमच्याकडे नोकरीत मोठे काम दिले जाईल. वस्तु सांभाळा.

तुळ – अहंकार ठेवल्यास मनासा त्रास होईल. तुमच्या कामात चुक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. शांतपण वागा.

वृश्चिक – राजकीय क्षेत्रात तुमचा प्रभाव पडेल. इतरांच्या नाराजीचा तुम्ही विचार करणार नाही. यश मिळवाल.

धनु – घरासंबंधी काम करून घेता येईल. दुसऱ्यांना मदत कराल. नोकरीत तुमच्या वरिष्ठ खुष होतील.

मकर – महत्त्वाचे काम करून घ्या. नोकरीच्या ठिकाणी इतरांची मदत घेता येईल. पण स्वतः जास्त लक्ष द्या.

कुंभ – धंद्यात फायदा होईल. अंदाज बरोबर येईल. मान-सन्मानाच योग येईल.

मीन – राहून गेलेले काम करून घ्या. ओळखीचा उपयोग होईल. जवळच्या लोकांना खुष कराल.