राशीभविष्य: शनिवार, २८ मार्च २०२०

daily horoscope horoscope Tuesday 19 April 2022
daily horoscope horoscope Tuesday 19 April 2022

मेष – तुमच्या कार्याला दिशा देता येईल. वरिष्ठ नोकरीत तुम्हाला मनस्ताप होऊ शकतो. धंद्यात फायदा होईल. अहंकार ठेऊ नका.

वृषभ – किरकोळ कारणाने तणाव होईल. मानसिक दडपण येईल. प्रवासात घाई करू नका. कोटीच्या कामासंबंधी चर्चा कराल.

मिथुन – महत्वाचे काम करून घ्या. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. पाहुणे येतील. खरेदीच्या मूड होईल. आवडते पदार्थ मिळतील.

कर्क – धंद्यात तुमचा अंदाज बरोबर येईल. महत्त्वाच्या कामासाठी प्रयत्न करा. यश मिळेल. दूरच्या प्रवासाचा विचार कराल.

सिंह – नोकरीत कामाचा ताण कमी करता येईल. नवीन ओळखी होतील. धंद्यात तुम्ही दुर्लक्ष करू नका. स्पर्धेत मेहनत घ्या.

कन्या – तुमचा विचार प्रभावी असला तरी तो पटण्यासाठी थोडा वेळ लागेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. नवे शिकाल.

तुळ – आज ठरविलेले काम करून घ्या. कामाच्या गुंता सोडता येईल. महत्त्वाची कागदपत्रे नीट ठेवा. वाहन जपून चालवा.

वृश्चिक – तुमच्या मनावर ताण होईल. कामाचा कंटाळा कराल. प्रवासात नवीन ओळख होईल. व्यवाहारात सावध रहा.

धनु – तुम्ही जे ठरवाल ते करून दाखवाल. स्पर्धेत पुढे जाल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. प्रवास कराल.

मकर – आत्मविश्वासाने वागाल. महत्त्वाच्या प्रश्नावर निर्णय घेता येईल. कला क्षेत्रात कल्पना शक्तीचा वापर कराल.

कुंभ – जबाबदारी पूर्ण राला. तुमचे विचार इतरांना पटवून देता येतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. स्पर्धा जिंकाल.

मीन – तुमचा अंदाज कौतुकास्पद ठरेल. धंद्यात वाढ कराल. कला, क्रिजा क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. ओळखी होतील.