मेष :- दौर्यात अडचण येऊ शकते. तुमची चूक स्पष्टपणे सांगणारी व्यक्ती समोर येईल. रागावर ताबा ठेवा.
वृषभ :- मनावरील दडपण कमी झाल्याने योग्य असा निर्णय घेता येईल. मौज-मजेत वेळ घालवाल.
मिथुन :- जे ठरवाल तेच काम होईल असे समजू नका. तडजोड करावी लागेल. बोलतांना काळजी घ्या.
कर्क :- मुलांचे सहकार्य मिळाल्यामुळे काम लवकर होईल. दूरच्या प्रवासाच्या विचार कराल. स्पर्धा जिंकाल.
सिंह :- प्रश्न समजून घेतल्यामुळेच त्यावरील उपाय शोधता येतो. दौर्यात खाण्याची काळजी घ्या.
कन्या :- नविन परिचयाने तुमच्या कामाला त्याचा उपयोग होऊ शकतो. वास्तु, वाहन खरेदीचा विचार कराल.
तूळ :- उत्साह वाढेल. खरेदी कराल. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. थकबाकी वसूल करता येईल.
वृश्चिक :- विचारांना योग्य दिशा मिळाल्यामुळे मनाची स्थिती चांगली राहिल. धंद्यात जम बसवा.
धनु :- कोणतेही काम करताना लागणारी वस्तु, कागदपत्र तपासून बरोबर घ्या. प्रवासात घाई करू नका.
मकर :- आजचे काम उद्यावर न टाकता आजच करा. कला क्षेत्रात तुमच्या कल्पना फारच प्रभावी ठरतील.
कुंभ :- स्पर्धेत प्रगती होईल. प्रेमाला चालना मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहिल. मौल्यवान खरेदी कराल.
मीन :- तुम्ही ठरविलेले काम वेळेत पूर्ण करता येईल. धंद्यात जम बसेल. नविन ओळखीचा फायदा होईल.