जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- मन उत्साहित राहील त्यामुळे प्रश्न सोडवता येतील. धंद्यात फायदा होईल. स्पर्धेत जिंकाल.

वृषभ :- अडचणीत आलेली कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष दिल्यास त्यात सुधारणा होईल. खंबीर रहा.

मिथुन :- रागाच्या भरात कोणालाही दुखवू नका. वृद्धांची काळजी वाटेल. वाहन जपून चालवा.

कर्क :- आज हाती घेतलेले काम पूर्ण करा. तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठ खूश होतील. स्पर्धेत प्रगती होईल.

सिंह :- ठरविलेले काम पूर्ण करता येईल. जुने स्नेही भेटण्यास येतील. कोर्ट केसमध्ये आशा वाढेल यशाची.

कन्या :- गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. खर्च होईल. मुलांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. प्रतिष्ठा मिळेल.

तूळ :- तुमच्यावर आरोप येण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होईल.

वृश्चिक :- जवळच्या माणसांची काळजी घ्यावी लागेल. मौज-मजा करण्याचे ठरवाल. खरेदी कराल.

धनु :- तुम्ही घेतलेल्या निर्णयावर एखादी व्यक्ती आक्षेप घेण्याची शक्यता आहे. भेटी घेण्यास जावे लागेल.

मकर :- आजचे काम आजच करा. मुलांनी दिलेल्या सल्ल्याचा जरूर विचार करा. कला क्षेत्रात चमकाल.

कुंभ :- क्षुल्लक घटना मन दूषीत करेल. तुम्ही मुलांच्या बाजूने विचार केल्याने नाराजी होऊ शकते.

मीन :- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नवीन ओळखीचा फायदा करून घेता येईल. स्पर्धेत चमकाल.