घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : मंगळवार ८ जानेवारी २०१९

आजचे भविष्य : मंगळवार ८ जानेवारी २०१९

Subscribe

मेष :- धंद्यात फायदा होईल. ठरविलेले काम पूर्ण होईल. मोठ्या कामाची ऑफर मिळेल. खर्च वाढेल. प्रवासात वाद नको.

वृषभ :- मन चंचल राहील. कामांची व्यवस्थित आखणी करा म्हणजे वेळ फुकट जाणार नाही. भेटीत यश मिळेल.

- Advertisement -

मिथुन :- अचानक नको असलेली व्यक्ती भेटेल. नम्रतेने बोला. मनावर दडपण येईल. कठीण काम नंतर करा.

कर्क :- आजचे काम आजच करा. धंद्यात वाढ होईल. वरिष्ठ खूश होतील. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल.

- Advertisement -

सिंह :- मान-सन्मानाचा योग येईल. ठरविलेल्या माणसांना भेटता येईल. जीवनसाथी निवडण्यात यश मिळेल.

कन्या :- तुमचे धोरण बरोबर असेल. वरिष्ठांबरोबर चर्चा करू शकाल. नम्रता ठेवा. कोर्टाच्या कामात यश मिळेल.

तूळ :- मनस्ताप होण्याची शक्यता आहे. दगदग होईल. थकवा वाटेल. पाहुण्यासाठी काम करावे लागेल.

वृश्चिक :- उत्साहवर्धक घटना घडेल. शेअर्स मार्केटचा अंदाज बरोबर येईल. घरात खुशखबर मिळेल.

धनु :- तुमच्या सुचनेला विरोध होण्याची शक्यता आहे. कामात अडचणी येतील. नको ती व्यक्ती तुमचा वेळ काढेल.

मकर :- मुलांबरोबर वेळ खर्च करावा लागेल. जीवनसाथीच्या बाजूचे लोक येतील. मदतीची अपेक्षा ठेवतील.

कुंभ :- क्षुल्लक वाद व गैरसमज होण्याचा संभव आहे. थट्टा-मस्करीमुळे तणाव संभवतो. प्रवासात वाद होण्याची शक्यता.

मीन :- रेंगाळलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. जुना वाद मिटवता येईल. धंदा वाढेल. नवे मित्र मिळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -