राशीभविष्य: सोमवार २३ जानेवारी २०२३

horoscope
राशीभविष्य

मेष ः- मान-प्रतिष्ठा मिळणारी घटना घडेल. धंद्यात मागे राहू नका. प्रवासात नवीन ओळख होईल.

वृषभ ः- वरिष्ठ नाराज होतील याची काळजी वाटेल. स्पर्धेत चमकाल. नवीन परिचय होईल.

मिथुन ः- घरातील समस्या सोडवता येईल. सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल. प्रेमाची साथ मिळेल.

कर्क ः- गुप्त कारवाया वाढू शकतात. नम्रपणे राहिल्यास कठीण कामे करण्याचा प्रयत्न करता येईल.

सिंह ः- मुलांची प्रगती सुखावह वाटेल. कला क्षेत्रात मन रमेल. नावलौकिक मिळेल.

कन्या ः- जुना वाद वाढवण्यापेक्षा मिटवता कसा येईल याचा विचार करता येईल. मित्र मदत करतील.

तूळ ः- आवडत्या कामात मन रमेल. सहलीचा आनंद घेण्याचे ठरवाल. कामाचा दर्जा वाढेल.

वृश्चिक ः- शेअर्सचा अंदाज घेता येईल. तुमच्या कामाचा प्रभाव सर्वत्र पडेल. नवीन काम मिळेल.

धनु ः- नव्या पद्धतीचा विचार करण्याची वेळ प्रसंगानेच घडून येते. प्रेमाची माणसे आधार देतील.

मकर ः- दुसर्‍यांचे विचार ऐकून घ्या. नम्रता ठेवा. प्रेमाने वागा. तडफदार रहा. कार्य ठरवा.

कुंभ ः- ठरविलेल्या कामात यश मिळेल. साहित्याला नवा विषय मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

मीन ः- जुने येणे वसूल करा. कला-साहित्यात चमकाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.