मेष : यश-अपयशाचे नानाविध विचार मनात येतील. उदास वाटेल. भविष्याची चिंता कराल.
वृषभ : आशेचा किरण दिसेल. धंद्यात लाभ होईल. मित्र-परिवारात वाढ होईल. खाण्याची काळजी घ्या.
मिथुन : खरेदी करण्याचा उत्साह राहिल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. प्रवासात आनंद मिळेल.
कर्क : मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल. प्रेम प्रकरणात मनाप्रमाणे घटना घडतील.
सिंह : धंद्यात लाभ होईल. प्रकृतीची तक्रार जाणवेल. पित्ताचा त्रास संभवतो. प्रवासात खर्च होईल.
कन्या : जीवनसाथीच्या सहाय्यामुळे मोठा प्रगतीचा पल्ला गाठता येईल. प्रेमाच्या व्यक्तीची भेट होईल.
तूळ : गैरसमज संभवतो. हिशोब करताना काळजी घ्या. जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : प्रवासाचा आनंद मिळेल. खाण्यापिण्याची चंगळ होईल. व्यवसायात लाभ होईल.
धनु : आप्तेष्टांच्या मदतीला जावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल.
मकर : करारीपणाने एखाद्या निर्णय घेऊन टाकाल. प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात लक्ष घालावे लागेल.
कुंभ : व्यवसायातील अडचणी कमी करता येतील. व्यापक दृष्टीकोन ठेवल्यास फायदा होईल.
मीन : एखाद्या प्रश्नाच्या सीमारेषेवर तुम्ही आहात असे वाटेल. मनाची द्विधा अवस्था होईल.