राशीभविष्य : मंगळवार, ५ नोव्हेंबर २०१९

do you know todays horoscope find out horoscope future

मेष : राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुम्ही ठरविल्याप्रमाणे कामे होतील. उत्साह वाढेल. खाण्याची चंगळ होईल. धंदा वाढेल.

वृषभ : घरातील व्यक्तीचा विचार ऐकून घ्या. नुकसान टाळता येईल. वाहन जपून चालवा. वरिष्ठांना दुखवू नका.

मिथुन : तुमच्या क्षेत्रात तुम्हाला चांगली संधी मिळेल. परंतु उतावळेपणा करू नका. गोड बोलणार्‍या व्यक्तीचा विचार करा.

कर्क : आजच्या दिवसात ठरविलेले काम करून घ्या. आळस करू नका. धंद्यात जास्त श्रम घ्यावे लागतील.

सिंह : कोणत्याही विषयावर चर्चा सफल होईल. निर्णय घेताना विचार करा. उद्या तुम्हाला निश्चितपणे चांगला मार्ग मिळेल.

कन्या : दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे करून घ्या. क्षुल्लक अडचण नंतर येऊ शकते. धावपळ होईल.

तूळ : धंद्यात सुधारणा होईल. चांगली घडल्यामुळे उत्साह वाढेल. मौज-मजेत वेळ घालवाल. प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक : अहंकाराचा प्रश्न कुठेही निर्माण करू नका. तुम्हाला धंद्यात यश मिळेल. खाण्याची रेलचेल होईल.

धनु : तुमचे प्रश्न सुटतील. धंद्यात वाढ होईल. प्रतिष्ठा मिळेल. गोड बोलणारी व्यक्ती लुबाडेल.

मकर : सामाजिक कार्यात प्रगती कराल. अध्यात्मिक क्षेत्रात मन रमेल. चांगल्या व्यक्तीचा सल्ला घ्या.

कुंभ : धावपळ होईल. शेजारी तुमच्यावर कामाची जबाबदारी टाकेल. नवीन ओळख होईल.

मीन : सकाळी महत्त्वाची कामे करा. अरेरावी करू नका. बोलताना सावध रहा. प्रतिष्ठा प्रेमाने मिळवा.