राशीभविष्य गुरुवार, १६ एप्रिल २०२०

daily horoscope horoscope Tuesday 19 April 2022
daily horoscope horoscope Tuesday 19 April 2022

मेष ःधंद्यात वाद होऊ शकतो. तुमच्यावर एखादी व्यक्ती आरोप करेल. प्रकृतीची काळजी घ्या.

वृषभ ःसरकारी दप्तरात काम करून घेताना वरिष्ठांना कमी समजू नका. कलाक्रीडासाहित्यात मागे राहू नका.

मिथुन ःतुम्ही ठरविलेले काम पद्धतशीरपणे पूर्ण करू शकाल. शेअर्समध्ये फायदा होईल.

कर्क ःताणतणाव कमी करता येईल. धंद्यात सुधारणा होईल. कल्पनाशक्तीचे कौतुक होईल.

सिंह ःधंद्यात नवे काम लवकर मिळवा. जमिनीचे अर्धवट राहिलेले काम करता येईल. मदत घेता येईल.

कन्या ःमनाची द्विधा अवस्था होईल. पाहुणे येतील. तुमच्या कामाचे, कलेचे कौतुक होईल.

तूळ ःकामाचा ताण वाढेल. काम करताना चूक होऊ शकते. सावध रहा. दुखापत होऊ शकते.

वृश्चिक ःमहत्त्वाचे काम करून घ्या. आळस करू नका. नवीन क्षेत्रातील लोकांची ओळख होईल.

धनु ःकोर्ट कचेरीच्या कामात प्रगती होईल. आरोप दूर करता येईल. स्वतःच्या उन्नतीचा विचार करा.

मकर ःकालचा उदासपणा दूर होईल. तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी कसा प्रयत्न करावयाचा याचा विचार करा.

कुंभ ःवाहनाचा वेग कमी ठेवा. रागाचा पारा वाढू शकतो. दुखापत संभवते. लॉटरीत पैसे मिळू शकतात.

मीन ःअडचणी कमी होतील. तुमच्या दिलदार स्वभावाचे कौतुक होईल. पदाधिकार मिळेल.