ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक शुभ योग सांगण्यात आले आहेत.यापैकीच एक शुभ योग म्हणजे ‘गजकेसरी योग’.ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हा योग आहे त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक यश प्राप्त होतात.असे लोक जीवनाच्या अनेक क्षेत्रात प्रसिद्धी आणि नाव कमावतात. तसंच पैशाच्या बाबतीतही त्यांना कसलीच कमी पडत नाही.ज्योतिष शास्त्रानुसार गजकेसरी योग हा अतिशय शुभ योग आहे. ज्योतिषीय गणनेनुसार १० डिसेंबर आणि ११ डिसेंबर रोजी कुंभ राशीमध्ये गजकेसरी योग सुरु होत आहे. त्याचा प्रभाव इतर राशींवरही दिसून येईल.
- मेष – मेष राशीच्या लोकांसाठी गजकेसरी हा शुभ योग घेऊन येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या लोकांना आर्थिक लाभ मिळेल आणि प्रतिष्ठा वाढेल.
- वृषभ – व्यवसायात आणि कायदेशीर वादात यश मिळू शकते.
- मिथुन – कोणत्याही कामासाठी केलेले प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील.
- कर्क – कर्क राशीसाठी चांगली बातमी येऊ शकते.या राशींसाठी विवाहाचा योग आहे.मात्र आरोग्याची काळजी घ्या.
- सिंह – काही नवीन बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.
- कन्या – नवीन मित्र आणि नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे.
- तुळ – तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. विद्यार्थ्यांच्या करिअरची चिंता दूर होईल.
- वृश्चिक – गजकेसरी योगाचा प्रभाव वृश्चिक राशीसाठीही सामान्य असेल. तब्येतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
- धनु – या राशीच्या लोकांसाठी हा योग विशेष राहणार नाही. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे.
- मकर – नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे आणि कौटुंबिक बाजूनेही चांगली बातमी येईल.
- कुंभ – गजकेसरी योगामुळे कुंभ राशीच्या लोकांना सामाजिक आणि मानसिक लाभ मिळेल.
- मीन – गजकेसरी योग मीन राशीसाठी आव्हाने घेऊन येत आहे. आरोग्य आणि परस्पर संबंधांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
हे ही वाचा – helicopter crash मध्ये बचावलेल्या वरूण सिंहांचे पत्र गाजतयं
- Advertisement -