राशीभविष्य: शुक्रवार ०१ जुलै २०२१

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : घरगुती विषयात तणाव होईल. वाटाघाटीचा प्रश्न उपस्थित होईल. धंद्यात लक्ष द्या.

वृषभ : आजचे काम उद्यासाठी देऊ नका. महत्त्वाची भेट घेता येईल. धंद्यात फायदा होईल.

मिथुन : नोकरीत चांगले वातावरण राहील. कोर्टाच्या कामासंबंधी चर्चा सफल होईल. नवे धोरण ठरवता येईल.

कर्क : गैरसमज दूर झाल्याने उत्साहाचे वातावरण घरात, बाहेर राहील. तुमची प्रतिष्ठा वाढेल.

सिंह : गुप्त कारवायांचा त्रास जाणवेल. धावपळ होईल. प्रवासात नवीन लोकांशी ओळख होईल.

कन्या : तणाव कमी होईल. वाद मिटवता येईल. वरिष्ठांच्या संबंधी चिंता कमी होईल.

तूळ : प्रकृतीकडे लक्ष द्या. महत्त्वाच्या वस्तू नीट सांभाळा. वेगळ्या प्रकारची संधी धंद्यात येईल.

वृश्चिक : धंद्यात काम वाढेल. आळस करता येणार नाही. आर्थिक बाजू नीट राहील. ओळख होईल.

धनु : आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा झाल्याने एखादे काम पटकन पूर्ण करता येईल. क्षुल्लक अडचण येईल.

मकर : मान-प्रतिष्ठेचा बाऊ न करता लोकांच्यासाठी कामे करा. सभा गाजेल. तुमचे बोल प्रभावी ठरतील.

कुंभ : धंद्यातील समस्या सोडवण्यास यश मिळेल. एखादी न सापडणारी वस्तू मिळेल. दडपण कमी होईल.

मीन : मनाची एकाग्रता वाढेल. नवे नोकर धंद्यासाठी मिळतील. घर, जमीन घेण्याचे ठरवाल.