राशीभविष्य: शुक्रवार ०३ मार्च २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- सकाळीच महत्त्वाचे काम करा. चहानंतर तुमचा वाद होईल. मुलांची मदत घेता येईल. संयम ठेवा.

वृषभ ः- अडलेले काम करून घ्या. नोकरीतील तणाव कमी होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल.

मिथुन ः- धंद्यात वाढ होईल. नोकरीत वर्चस्व राहील. चिंता करण्यापेक्षा कामात लक्ष द्या.

कर्क ः- आज संध्याकाळी एखादी चांगली घटना घडेल. प्रवासात घाई नको. महत्त्वाची वस्तू नीट ठेवा.

सिंह ः- सकाळी महत्त्वाचे काम करा. चर्चा सफल होईल. महत्त्वाचा फोन येईल. दुपारनंतर विचारात पडाल.

कन्या ः- तुमच्या कामात यश मिळेल. डावपेच यशस्वी होतील. धंद्यात फायदा होईल. मित्र वाढतील.

तूळ ः- तुमच्यावर दबाव येईल. प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. गोड बोलण्यावर भाळूून जाल.

वृश्चिक ः- दुपारनंतर तुम्हाला चांगली प्रेरणा मिळेल. विरोध मोडून काढता येईल. धंद्यात आळस नको.

धनु ः- सकाळीच सरकारी कामे करू नका. औषध वेळेवर घ्या. भावनेच्या आहारी जाल.

मकर ः- रागाचा पारा वाढेल. हात उचलू नका. प्रेमाने बोला. संध्याकाळी मार्ग शोधता येईल.

कुंभ ः- किरकोळ तणाव संभवतो. पत्नी, मुले यांची मर्जी राखावी लागेल. खर्च होईल.

मीन ः- अपेक्षित व्यक्ती भेटेल. अडलेले काम होईल. आळस करू नका. मागील येणे वसूल करा.