राशीभविष्य: शुक्रवार ०६ मे २०२२

horoscope daily horoscope thursday april 07 2022
राशीभविष्य

मेष :- महत्त्वाची कामे लवकर करून घ्या. कोर्टाच्या कामात यश मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

वृषभ :- कोर्ट कचेरीचे काम होईल. धंद्यात फायदा वाढेल. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल.

मिथुन :- विरोधाचा सामना करावा लागेल. दादागिरीने वागू नका. प्रतिष्ठा टिकवण्याचाच विचार करा.

कर्क :- कुटुंबात नाराज झालेल्या लोकांना खूशखबर देता येईल. मौज-मजा करण्याचा विचार कराल.

सिंह :- क्षुल्लक कारणामुळे एखादे काम अडून राहील. दूरदृष्टीकोन ठेवा. वाहन जपून चालवा.

कन्या :- मुलांच्या समस्या कमी करता येतील. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. धंदा वाढेल.

तूळ :- घरगुती कामे होतील. विचार बदलावा लागेल. प्रतिष्ठित व्यक्तीची भेट होईल.

वृश्चिक :- अपेक्षित व्यक्तीकडून ठरलेले काम करून घेता येईल. क्षुल्लक वाद करण्यापेक्षा ध्येय गाठा.

धनु :- धंद्यात फायदा होईल. मागील येणे वसूल करा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मकर :- तुमच्याकडून समोरची व्यक्ती मदतीची अपेक्षा ठेवेल. वाटाघाटीत सर्व विचार ऐकून घ्या.

कुंभ :- तुमच्या मनाविरुद्ध निर्णय होऊ शकतो. ठरविलेले काम अचानक बदलावे लागेल. पाहुणे येतील.

मीन :- योजनेला गती प्राप्त होईल. थकबाकी वसूल करा. पाहुणे येतील. मोठी खरेदी कराल.