Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : शुक्रवार 07 मार्च 2025

Horoscope : शुक्रवार 07 मार्च 2025

Subscribe

मेष – घर व ऑफिसमधील सर्व समस्या संयमाने यशस्वीपणे सोडवल्या जातील. वैवाहिक आयुष्यात आनंद असेल.
वृषभ – कार्यक्षेत्रात योग्यता सिद्ध झाल्याने फायदे होतील. नवीन संधीही उपलब्ध होतील. कामात व्यस्त राहाल.
मिथुन – व्यवसायातील एखाद्या करारात विरोध होईल. आत्मविश्वासाने प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
कर्क – अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याचे पालन केल्यास फायदा होईल. कामाचा ताण वाढणार नाही याची काळजी घ्या.
सिंह – उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक बाजू ठीक असेल. प्रामाणिकपणे काम कराल. आळशीपणा टाळा.
कन्या – तुमच्या मेहनतीला यश येईल. एखाद्याच्या बोलण्याने तुम्ही दुखावलात तर ती गोष्ट मनात ठेवू नका.
तुळ – तुमच्यातील छुपी प्रतिभा बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आर्थिक समस्या नष्ट झाल्यामुळे तणावमुक्त वाटेल.
वृश्चिक -वरिष्ठांच्या मदतीने समस्यांचे निराकरण कराल. मनातून नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा.
धनु – आनंदाच्या क्षणांचा अनुभव घ्याल. कठोर परिश्रम घेतल्याने गेल्या काही दिवसांतील नुकसानीची पूर्तता होईल.
मकर – एकाग्रतेने केलेले काम यशस्वी होईल. अतिभावनाप्रधान होणे टाळा. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
कुंभ – लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील. विचित्र लोकांपासून दूर राहा. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होऊ शकतो.
मीन – वातावरणात चैतन्य आणण्याचा प्रयत्न करा. सहकार्‍यांचे अपेक्षित सहाय्य मिळेल. खरेदी करताना सावध राहा.