राशीभविष्यः शुक्रवार ०८ ऑक्टोबर २०२१

Horoscope
राशीभविष्य

मेष :- धंद्यात समस्या येईल. नोकरवर्गाकडून अडचणी येतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला कमी लेखले जाईल.

वृषभ :- आजच्या कामात आळस करू नका. महत्वाची भेट घेता येईल. तुमच्या मनाप्रमाणे कामे करता येतील.

मिथुन :- समस्या सोडवता येईल. धंद्यामध्ये अरेरावीने बोलून अधिक ताण वाढेल. स्पर्धेत मेहनत घ्यावी लागेल.

कर्क :- तुमच्या योजनेला गती देता येईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. मान-सन्मानाचा योग येईल.

सिंह :- धंद्यात फायदा होईल. प्रेमाने कोणतीही समस्या सोडवा. नातलगांसाठी वेळ खर्च करावा लागेल.

कन्या :- महत्वाचा निर्णय घेता येईल. धंद्यात मोठे काम मिळेल. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा.

तूळ :- किरकोळ अडचणी आजच्या कामात येतील. वादविवाद होईल. तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करू नका.

वृश्चिक :- आजचे काम उद्यावर टाकू नका. आळस करू नका. शेअर्सचा अंदाज घेता येईल. धंदा सुधारेल.

धनु :- ठरविलेले काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. मुले मदत करतील.

मकर :- तुमच्या कार्याला सर्वांचा चांगला. प्रतिसाद मिळेल. नवीन लोकांचा परिचय होईल. धंद्यात मोठा करार करता येईल.

कुंभ :- एखाद्या प्रकरणाचा तुम्हाला त्रास होईल. दुसर्‍यांच्यासाठी धडपड करावी लागेल. कठीण काम अधिक कठीण वाटेल.

मीन :- काम रेंगाळत ठेऊ नका. आळस नको. आजच चांगला निर्णय घेऊन धंद्याची वाढ करण्याचा विचार करता येईल.