राशीभविष्य: शुक्रवार १० मार्च २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- वैर वाढवू नका. उद्याची वाट पहा. समस्या सोडवता येईल. तुमची मैत्री करण्याची एखादी नवी पद्धत शोधा.

वृषभ ः- घरातील व्यक्ती खूश होतील. मान-प्रतिष्ठा मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. कला क्षेत्रात रमाल.

मिथुन ः- प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. घरातील व्यक्तीची नाराजी दूर करता येईल. धंदा वाढवा.

कर्क ः- राहिलेले काम करता येईल. अपमानाकडे लक्ष न देता कार्य करा. रागावर ताबा ठेवा. यश मिळेल.

सिंह ः- तुमचा प्रभाव वाढेल. प्रेमाची माणसे भेटतील. बहुमतांचा फायदा घेता येईल. स्पर्धा जिंकाल.

कन्या ः- तुमच्यावर विश्वास ठेवणारी माणसे मदत करतील. स्पर्धेत चमकाल. प्रसिद्धी व पैसा मिळेल.

तूळ ः- कामात चूक होऊ शकते. रागावर ताबा ठेवा. प्रेमात वाद होईल. प्रकृतीची काळजी घ्या.

वृश्चिक ः- आजचे काम आजच करा. आळस करू नका. मित्र मिळतील. स्पर्धेत कष्ट घ्यावे लागतील.

धनु ः- विश्वास ठेवावा लागेल. वाद मिटवता येईल. क्षुल्लक व्यक्ती तुम्हाला नाउमेद करू शकते.

मकर ः- तुमचे महत्त्व टिकवण्यासाठी प्रयत्न करता येतील. धंद्यात काम मिळेल. शत्रूला नमवता येईल.

कुंभ ः- तुमचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे. प्रेमात गैरसमज होईल. पोटाची काळजी घ्या.

मीन ः- महत्त्वाचे पद वरिष्ठ तुम्हाला देतील. स्पर्धेत चमकाल. नवा विषय शिकण्यास मिळेल.