राशीभविष्यः शुक्रवार १२ नोव्हेंबर २०२१

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- अचानक काम होण्यास विलंब लागेल. संयम ठेवा. प्रयत्न करा. मनातील गुप्त गोष्ट कुणलाही सांगू नका.

वृषभ :- प्रश्न सोडवण्यात जास्त कष्ट घ्यावे लागतील. नवीन परिचय होईल. उत्साह वाढेल. धंदा मिळेल.

मिथुन :- आनंदी दिवस राहील. जुने मित्र भेटतील. वाद मिटेल. कोर्टकेसमध्ये मार्ग मिळेल. स्पर्धा जिंकता येईल.

कर्क :- सकाळी न होणारे काम दुपारनंतर मार्गी लावता येईल. प्रवासात घाई नको. वाद व तणाव वाढवू नका.

सिंह :- दगदग वाढेल. घाई गर्दीत प्रकृतीची काळजी घ्या. घरात किरकोळ वाद होतील. रस्त्याने सावधपणे चाला.

कन्या :- कामात सुरुवातीला अडचणी येऊ शकतात. तुम्ही शांत प्रकरणे हाताळा. यश मिळू शकेल.

तूळ :- महत्वाचे काम लवकर करण्याचा प्रयत्न करा. किरकोळ मतभेद संध्याकाळी होतील. निर्णय घेण्यात तुमचा गोंधळ होईल.

वृश्चिक :- संध्याकाळनंतर उत्साह वाढेल. कामात आळस होईल. वेळेला व काम करण्यात महत्व द्या.

धनु :- अडचणींवर मात करता येईल. वरिष्ठ शाब्बासकी देतील. नवीन ओळखी प्रवासात होतील. वाहन जपून चालवा.

मकर :- अपेक्षित व्यक्तीची मदत मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. प्रतिष्ठा वाढेल. यशस्वी दिवस राहील.

कुंभ :- धंद्यात नवे मोठे काम मिळेल. वरिष्ठ खूष होतील. मान-सन्मानाचा योग येईल. घरात उत्साही वातावरण राहील.

मीन :- सकाळी काम करण्यात अडथळे येतील. जिद्द ठेवा. खर्च वाढेल. पाहुणे येतील. महत्वाची कामे होतील.