राशीभविष्य: शुक्रवार २२ जुलै २०२२

horoscope daily horoscope horoscope Tuesday 11 july 2022
राशीभविष्य

मेष : उत्साह वाढेल. आनंदी रहाल. नवीन कार्याचा विचार यशस्वी करून दाखवणारी योजना बनवता येईल.

वृषभ : धंद्यात फायदा होईल. गोड बोलून तुमचे काम होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

मिथुन : आनंदी रहा. धंद्यात वाढ होईल. तुम्हाला चांगली बातमी ऐकावयास मिळेल. राग आवरा.

कर्क : स्पर्धेत जिंकाल. मान-सन्मान मिळेल. नवे कार्य आरंभ करता येईल. लोक साथ देतील.

सिंह : तुमच्या मनावर जबाबदारीचे दडपण येईल. जवळचे लोक मदत करतील. उत्साह राहील.

कन्या : विचारांना चालना मिळेल. कार्य करण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल. देवीच्या कृपेने यश मोठे मिळवाल.

तुला : जुन्या आठवणीने मन भारावून जाईल. धंदा वाढेल. पाहुणे येतील. आनंदाची बातमी मिळेल.

वृश्चिक : नव्या विचाराने तुम्ही गतिमान व्हाल. धंद्यात काय सुधारणा करता येईल, ते ठरवाल.

धनु : मन प्रसन्न राहील. पाहुण्यांचे स्वागत कराल. नवीन ओळखीचा फायदा मिळेल. धंदा वाढेल.

मकर : तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. नव्या लोकांच्या सहवासाने प्रेरणा मिळेल. आवडते पदार्थ सेवनात मिळतील.

कुंभ : कामाचा व्याप वाढेल. आनंदी रहाल. किरकोळ अडचण येईल. सावधपणे कामे करा.

मीन : आनंदाच्या भरात कुणालाही मोठे आश्वासन द्याल. पदाधिकार मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.