घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार २२ मार्च २०२४

राशीभविष्य : शुक्रवार २२ मार्च २०२४

Subscribe

मेष- तुमचे मत व्यक्त करताना वरिष्ठांच्या विचारांची दखल घ्यावी लागेल. प्रेमात तुमचा विजय होईल. धंदा तेजीत चालेल.

वृषभ- मनाला दुःख होईल असे उद्गार काढू नका. सामाजिक कार्यात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

- Advertisement -

मिथुन- नव्या विचाराने प्रेरित व्हाल. प्रेमाची व्यक्ती भेटेल. स्वार्थी विचाराने वागल्यास आनंद उपभोगता येणार नाही.

कर्क- तुमच्या कामात इतरांची ढवळा-ढवळ होईल. वाद होईल. कायद्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. संयम बाळगा.

- Advertisement -

सिंह- मुलांच्या प्रगतीचा आनंद मिळेल. स्वेच्छेवर राजकारणात चालता येत नाही. सर्वांच्या विचाराने पुढे जाता येईल.

कन्या- अवघड कामात यश मिळेल. जुने येणे वसूल करण्याचा प्रयत्न करा. प्रवासात चांगल्या मित्रांची ओळख होईल.

तूळ- कामात प्रामाणिकपणे राहिल्यास लाभ होईल. उत्साह राहील. प्रवासाचा बेत ठरवण्यात यश मिळेल. धंद्यात लक्ष द्या.

वृश्चिक- तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक केल्यास शेअर्समध्ये फायदा होईल. व्यसनाच्या आहारी न जाता कामावर लक्ष जास्त द्या.

धनु- इतरांचा सल्ला घेणे तुम्हाला कमीपणाचे वाटू नये. वाहन जपून चालवा. प्रेमाने वागल्यास अडचणी दूर होतील.

मकर- अपेक्षा पूर्ण होतील व महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सामाजिक कार्यात कष्ट करावे लागतील. यश खेचून आणाल.

कुंभ- कुणाच्या तरी चांगल्या सल्ल्यामुळे चुका कमी होतील. कामात वरिष्ठ खूश होतील. बढती मिळेल. दिवस चांगला जाईल.

मीन- आत्मविश्वासाने बोलता व वागता येईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. अडचणी कमी होतील. धंद्यात नवे काम मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -