मेष – नव्या खरेदीचा मोह टाळा. मानसिक उत्साह जाणवेल. तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. प्रगतीचा नवा मार्ग शोधणे शक्य होईल.
वृषभ – आपल्या घरातील वडीलधार्यांच्या सल्ल्याचे पालन करा. व्यवहारात अत्यंत चाणाक्ष राहावे लागेल. प्रवासात कधीही घाई करू नका.
मिथुन – वैवाहिक जीवनात सुख समाधान नांदेल. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कलेत मन रमेल.
कर्क – आपल्या कार्यपद्धतीत योग्य तो बदल करा. आपल्या जबाबदारीत वाढ होणार आहे. आर्थिक लाभ होईल. प्रतिष्ठा सांभाळता येईल.
सिंह – आपल्याकडून कुणाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या आर्थिक व्यवहारास चालना मिळेल. धंद्यात वाढ होईल.
कन्या – विरोधकांना आपल्या बाजूने वळवता येईल. आर्थिक लाभाचे योग येतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यास योग्य गती प्राप्त होईल.
तूळ – नोकरीधंद्यातील अधिकाराचा योग्य वापर करा. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रगतीचे संकेत मनास समाधान प्रदान करतील.
वृश्चिक – घरातील कामे होतील. क्षुल्लक ताणतणावाचा सामना करावा लागेल. आपल्या श्रमाचे योग्य मूल्यांकन केले जाईल. संयम राखा.
धनु – धंद्यातील चर्चा संयमाने करा. मन स्थिर ठेवता येईल. वाहन जपून चालवा. प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख होईल. गैरसमज दूर होईल.
मकर – वरिष्ठ खूश होतील. महत्त्वाचे काम रेंगाळत ठेवू नका. योग्य निर्णय घेता येईल. जबाबदारीचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ – आर्थिक व्यवहारात लाभाचे योग येतील. बुद्धिचातुर्याने कामास गती प्राप्त होईल. आप्तेष्टांना मदत करावी लागेल. नोकरीत काम वाढेल.
मीन – बोलताना वाहवत जाऊ नका. आर्थिक व्यवहारात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. वरिष्ठांचा पाठिंबा आपल्या मनास समाधान प्रदान करेल.
Horoscope : शुक्रवार 24 जानेवारी 2025
written By rohit patil
Mumbai