राशीभविष्य: शुक्रवार २६ मे २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : काम करताना चूक होईल. दुसर्‍याची चूक झाल्यास त्याला क्षमा करा. सावध रहा. धावपळ होईल.

वृषभ : गैरसमज दूर होईल. आनंदी रहाल. मनाप्रमाणे घरातील कामे होतील. पाहुण्यांचे स्वागत कराल.

मिथुन : क्षुल्लक कारणाने कामाचा व्याप वाढेल. कोणत्याही प्रसंगाची तयारी करताना मन स्थिर ठेवा.

कर्क : वेगाने काम पूर्ण कराल. मोठे लोक भेटतील. आनंदाने समारंभ साजरा कराल.

सिंह : किरकोळ कारणाने धावपळ होईल. प्रेमाची माणसे भेटतील. स्पर्धेत एकाग्रता ठेवा.

कन्या : विचारांना दिशा मिळेल. कला क्षेत्रात चमकाल. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल.

तुला : दिलेला शब्द पाळता येईल. कामाचा व्याप वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. संयमाने बोला.

वृश्चिक : तुमचा प्रभाव पडेल. धंद्यात वाढ होईल. नवीन ओळखी होतील. मनोभावे प्रार्थना करा.

धनु : एखादी वस्तू विसरण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्ती आग्रहाने बोलवतील.

मकर : महत्त्वाचे काम होईल. जुने स्नेही भेटतील. मनापासून केलेली याचना पूर्ण होते. मन स्थिर ठेवा.

कुंभ : दगदग होईल. किरकोळ घटना मनाला त्रस्त करेल. तुमची प्रतिष्ठा शाबूत राहील.

मीन : प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. मन आनंदी होईल. चिंतनाने व भजनाने प्रसन्नता वाटेल.