मेष – आजचे काम उद्यावर टाकू नका. प्रयत्नाने पुढे जाता येईल. घरातील कुरबुरींमध्ये लक्ष घालू नका.
वृषभ – मित्र अथवा नातेवाईकांमध्ये पैशांचे व्यवहार होतील. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. महत्त्वाची चर्चा करता येईल.
मिथुन – कोर्टाच्या कामात यश मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आपणास लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत.
कर्क – प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. आपल्या कामाचे कौतुक केले जाईल. धंद्यातील वाटाघाटीत यश मिळेल.
सिंह – अडचणीतून आपला मार्ग शोधावा लागेल. नोकरी-उद्योगधंद्यात यशस्वी व्हाल. आपला स्वाभिमान जपा.
कन्या – नोकरीत तुमचे कर्तृत्व दिसेल. जुने मित्र भेटतील. अपेक्षित यशासाठी प्रयत्नांची कास सोडू नये.
तुळ – शक्यतो आर्थिक व्यवहारात सावध राहा. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. कर्जातून दिलासा मिळू शकेल.
वृश्चिक – मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे, सूचना आणि सल्ला ऐकून घेणे हिताचे ठरेल.
धनु – कौटुंबिक वातावरण उत्साही व आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. विनम्रता यशकारक ठरेल. ठरवलेले काम वेळेत पूर्ण कराल.
मकर – कठीण प्रसंगावर मात करावी लागेल. धंद्यातील प्रश्न सोडवता येईल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल.
कुंभ – कोणताही निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला घ्यावा. वैवाहिक जीवन सुखकारक राहील. नोकरी-व्यवसायात बदल जाणवतील.
मीन – कौटुंबिक जबाबदार्या सक्षमतेने पार पाडाल. विनाकारण खर्चावर नियंत्रण ठेवावे. गुंतवणुकीतून लाभ मिळतील.
Horoscope : शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
written By My Mahanagar Team
Mumbai