मेष – अधिक खर्च होणार नाही याचे भान ठेवा. जुनी येणी वसूल होतील. आरोग्य जपा. महत्त्वाचे काम करण्यात आळस करू नका.
वृषभ – प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल. मानसिक, शारीरिक परिश्रम अधिक होतील. वाहन जपून चालवा. धंद्यात काम मिळेल.
मिथुन – धंद्यातील चर्चा यशस्वी होईल. आपण ठरवलेले काम पूर्ण करता येईल. मुलांची चिंता सतावेल. मान-सन्मान मिळेल.
कर्क – जोडीदारासोबत वेळ घालवाल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. शक्य असल्यास वाद टाळा. कार्याला योग्य दिशा मिळेल.
सिंह – वरिष्ठांच्या सहकार्यानेच वागावे लागेल. अधिक परिश्रमाची कामे टाळा. मानसिक शांतता लाभेल. प्रवासाचे नियोजन कराल.
कन्या – नवा परिचय होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांसोबत एखाद्या गहन चर्चेत सहभागी होऊ नका. खरेदी कराल.
तूळ – नोकरीत कामाचा आळस करू नका. आपले वरिष्ठ प्रसन्न होतील. बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत याचे भान ठेवा.
वृश्चिक – नवीन ओळखीचा उपयोग होईल. रचनात्मक आणि कलात्मक शक्तीला चालना मिळेल. तक्रारीला वाव देऊ नका.
धनु – मौजमजेसाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. काहीतरी नवनिर्मिती कराल. वाद-विवादात पडू नका. घरगुती कामे होतील.
मकर – नोकरीत आपले वर्चस्व राहील. घरात क्षुल्लक कारणावरून तणाव होईल. आर्थिक बाबतीत व्यवस्थित योजना तयार कराल.
कुंभ – रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. मैत्रीत वाढ होईल. वरिष्ठांपासून सांभाळून राहा. गृहस्थ जीवनाचा पूर्ण आनंद घ्याल.
मीन – कोर्टाच्या कामाला दिशा मिळेल. नातेवाईकांसोबत वादाचे प्रसंग येतील. वैचारिक दृढतेमुळे कामे चांगल्या रीतीने पूर्ण कराल.
Horoscope : शुक्रवार 29 नोव्हेंबर 2024
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -