घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार ११ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : शुक्रवार ११ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. वरिष्ठांची नाराजी होऊ देऊ नका. सहकारी, नेते मदत करतील.

वृषभ : कोर्टाचे काम करून घ्या. पैशाने तुमची समस्या सोडवता येईल असे समजू नका. फसगत होऊ शकते.

- Advertisement -

मिथुन : नोकरीत कामाचा ताण सहन करून इतरांची मर्जी राखावी लागेल. एखादा चांगला मित्र मदत करेल.

कर्क : घरात वाद होईल. खाण्याची काळजी घ्या. पोटाचा त्रास होऊ शकतो. दगदग जास्त होईल.

- Advertisement -

सिंह : योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल. जुने मित्र भेटतील. धंद्यात काम मिळेल. कोर्ट केस चांगली ठरेल.

कन्या : क्षुल्लक कारणावरून मतभेद होईल. घरात कामे वाढतील. धंद्यात ताणाताणी करू नका. सौम्य धोरण ठेवा.

तूळ : आज ठरविलेली भेट यशस्वी होईल. चर्चा उत्तम होईल. धंद्यात वाढ होईल. तुमचा अंदाज बरोबर येईल.

वृश्चिक : छोट्याशा कारणावरून चिडचिड करू नका. वाहन जपून चालवा. तुमचा अंदाज बरोबर येईल.

धनु : प्रेमाची माणसे भेटतील. वाटाघाटीचा प्रश्न सोडवता येईल. मोठे लोक तुम्हाला गृहीत धरतील. स्पष्ट बोलावे लागेल.

मकर : धंद्यात वाढ करता येईल. जास्त मोह ठेवू नका. ओळखीचा उपयोग कसा करावयाचा याचा विचार करा.

कुंभ : महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. विचारांना चालना मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

मीन : वाहनापासून त्रास होईल. खर्च वाढेल. रागावर ताबा ठेवा. कायदा महत्त्वाचा असतो. मोह टाळा.

- Advertisment -