घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार १८ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : शुक्रवार १८ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : घरातील कामे होतील. नवीन ओळख होईल. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल. प्रकृतीत सुधारणा होईल. नम्रता ठेवा.

वृषभ : शेजारी निष्कारण त्रस्त करण्याचा प्रयत्न करतील. धंद्यात अनाठाई खर्च होऊ शकतो. कोर्ट केसकडे लक्ष ठेवा.

- Advertisement -

मिथुन : महत्त्वाचे काम लवकर होईल असे गृहित धरू नका. प्रयत्न करा. जवळचे लोक मदत करतील. वरिष्ठ तटस्थ असतील.

कर्क : राजकीय क्षेत्रात वरिष्ठांची मर्जी राखा. जवळचे लोक कुरबुर करण्याचा प्रयत्न करतील. धंद्यात आळस करू नका.

- Advertisement -

सिंह : विचारांना योग्य दिशा मिळेल. धंद्यात वाढ होईल. रागाचा पारा वाढू देऊ नका. मोठे काम मिळवता येईल.

कन्या : धावपळ होईल. जवळच्या व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. जमिनीसंबंधी काम करण्यात अडचण येईल.

तूळ : आप्तेष्ठांची भेट होईल. उत्साह-आत्मविश्वास वाढेल. धंदा मिळेल. योग्य ठिकाणी पैसे गुंतवा. नोकरी शोधा.

वृश्चिक : तुम्ही ठरविल्याप्रमाणे काम करून घेण्यात क्षुल्लक अडचण येईल. धाडस करू नका. वाहन जपून चालवा.

धनु : कला-क्रीडा स्पर्धेत तुमचे कौतुक होईल. योग्य मार्गदर्शन मिळेल. घरातील कामे करून घेता येईल.

मकर : तुमच्या कार्याची दिशा नक्की ठरवा. वेगाने योजना पूर्ण करा. नोकरीचा प्रयत्न करा. आळस नको.

कुंभ : व्यवसायात चांगली बातमी मिळेल. अविवाहितांना योग्य स्थळे मिळतील. नोकरीत मनाप्रमाणे बदल करता येईल.

मीन : नुकसान भरून काढता येईल. घर खरेदी-विक्री करता येईल. नवीन परिचय होईल. साहित्यात चमकाल.

- Advertisment -