मेष – प्रकृतीचे तंत्र सांभाळल्यास पुष्कळशा गोष्टी मनाप्रमाणे होतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. इच्छित गोष्टी साध्य कराल.
वृषभ – कौटुंबिक वातावरण छान राहील. बराच काळ रेंगाळलेले एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. अनावश्यक खर्च करणे टाळा.
मिथुन – आपले प्रकृतीमान ठीक राहील. व्यावसायिकांना नव्या व्यवसायाची चाहूल लागण्याची शक्यता आहे. वादाचे प्रसंग टाळा.
कर्क – अपेक्षितांकडून मदतीचा हात मिळेल. महत्त्वाचे दस्तऐवज आणि कागदपत्रे जपून ठेवा. अनोळखी व्यक्तींशी सांभाळून राहा.
सिंह – कौटुंबिक तसेच वैवाहिक जीवनातील समस्या त्वरित सोडवा. आपल्या नावलौकिकात भर पडेल. प्रवासात सावधानता बाळगा.
कन्या – सामाजिक क्षेत्रातील शान वृद्धिंगत होईल. बोलताना गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या. नोकरदारांना अपेक्षित संधी मिळतील.
तूळ – हितचिंतक आणि हितशत्रूंना योग्य तर्हेने हाताळाल. कौटुंबिक जीवनात आपणास सुख-समाधान लाभेल. अध्यात्मात मन रमेल.
वृश्चिक – हाती घेतलेल्या कार्यात यशाची अपेक्षा करू शकता. गुंतवणुकीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. कल्पनांना प्रोत्साहन मिळेल.
धनु – व्यापार-उद्योगधंद्यात नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. प्रकृतीची पथ्ये पाळा. आपली आर्थिक बाजू भक्कम ठेवता येईल.
मकर -कार्यक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू शकाल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. नातेसंबंधात कटूता येऊ देऊ नका.
कुंभ – आवडत्या क्षेत्रात अग्रेसर राहाल. कामानिमित्त प्रवास कराल. कौटुंबिक जीवनात मंगलमय प्रसंगाचा आनंद घेऊ शकाल.
मीन – अडचणीच्या वेळी मित्र मदत करतील. आपल्या मधुर वाणीने आपले इप्सित साध्य करू शकाल. कार्यक्षेत्रात मोठी झेप घ्याल.