घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शुक्रवार १३ जानेवारी २०२३

राशीभविष्य: शुक्रवार १३ जानेवारी २०२३

Subscribe

मेष ः- घरातील व्यक्तीचा आपुलकीचा सल्ला उपयोगी पडेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. स्पर्धेत जिंकाल.

वृषभ ः- कठीण काम करून घेता येईल. ओळखीचा उपयोग धंद्यात करता येईल. स्पर्धेत जिंकाल.

- Advertisement -

मिथुन ः- मनाप्रमाणे घटना घडल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. धंद्यात जम बसवता येईल. प्रवासाचा बेत ठरवाल.

कर्क ः- धंद्यातील अडचणी सोडवता येतील. नवे काम मिळेल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल.

- Advertisement -

सिंह ः- विचारांचा गुंता सोडवता येईल. धंद्यात नवे काम मिळेल. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा.

कन्या ः- दादागिरी करून समस्या सोडवता येणार नाही तर ती अधिक वाढू शकते. कायद्याचे पालन करा.

तूळ ः- मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आनंदी व्हाल. धंद्यात जम बसेल. मान-प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक ः- तुमचे वर्चस्व सर्व ठिकाणी वाढलेले पाहून विरोधक चवताळतील. कलाप्रेमी व्यक्ती उत्साही होतील.

धनु ः- नातलगांचा सहवास आनंद देणारा ठरेल. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. धंदा वाढेल.

मकर ः- तुम्हाला तुमचे वर्चस्व, स्थान टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दुसर्‍यांच्या चुका काढून मोठे होता येत नाही.

कुंभ ः- कुटुंबासमवेत आनंदी रहाल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. धंद्यात मोठा फायदा होईल. नवे मित्र मिळतील.

मीन ः- प्रवासात घाई करू नका. भावनेच्या भरात एखादी व्यक्ती तुम्हाला लुटण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -