राशीभविष्य: शुक्रवार ,१४ जानेवारी २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- मुलांच्या सल्ल्याचा उपयोग करून घेतल्यास प्रश्न सोडवता येईल. विचारांना चालना मिळेल. स्पर्धेत कौतुक होईल.

वृषभ :- किरकोळ तणाव वाढू शकतो. वाहनापासून त्रास संभवतो. प्रश्न सोडवता येईल. मोठ्यांचा आधार वाटेल.

मिथुन :- कठीण काम करून घेता येईल. नको असलेल्या व्यक्तीला झिडकारण्यापेक्षा गोड बोलून गुपित काढून घ्या.

कर्क :- धंद्यात वाढ होईल. जुने येणे वसूल होऊ शकेल. प्रतिष्ठेवर झालेला आरोप दूर करण्याची संधी मिळेल.

सिंह :- मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करता येईल. प्रवास सुखाचा होईल. प्रसंग सांभाळून घ्या.

कन्या :- बुद्धिवरचा ताबा गेल्यानेच माणूस सैरभैर होतो. संताप करतो. संयम ठेवा. कमी बोला. निरीक्षण करा.

तूळ :- महत्त्वाचे कोणतेही काम करून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे विचार इतरांना पटवून देता येतील.

वृश्चिक :- कामाचा वेग वाढवल्यास अनेक कामे करून घेता येतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. मित्र भेटतील.

धनु :- अडलेले काम होईल. योग्य निर्णय घेऊ शकाल. धंद्यात फायदा होईल. नवे काम ओळखीतून मिळू शकेल.

मकर :- वाहनाचा वेग वाढवू नका. तडजोडीचे धोरण ठेवा. वादविवाद जास्त ताणू नका. थकवा वाटेल.

कुंभ :- घरातील गैरसमज दूर होऊ शकेल. महत्त्वाचे काम आजच करून घ्या. भेटीत यश येईल. प्रतिष्ठा वाढेल.

मीन :- तुमचे बोलणे एखाद्याच्या मनाला लागेल. काळजी घ्या. प्रेमाने प्रश्न मिटवा. प्रवासात घाई नको. खर्च वाढेल.