Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : शुक्रवार 31 जानेवारी 2025

Horoscope : शुक्रवार 31 जानेवारी 2025

Subscribe

मेष -सहकारी, कामगारांशी सुसंवाद राखावा. तणाव कमी होईल. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी. नवीन संधी उपलब्ध होतील.
वृषभ – मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. भावंडांशी वादविवाद टाळावेत. आपल्या कार्याला योग्य दिशा मिळेल. प्रतिष्ठा राखता येईल.
मिथुन -गैरसमज दूर करता येतील. कामे पूर्ण होतील. तुमच्या मनाचा गोंधळ उडेल. जुने मित्र भेटतील. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.
कर्क – नोकरी-व्यवसायात महत्त्वाकांक्षी योजना राबवाल. संततीशी निगडित प्रश्न सोडवू शकाल. आपले मन अस्थिर होईल.
सिंह – ठरवलेले काम पूर्ण कराल. मोठे व्यावसायिक धाडस नको. घरातील व्यक्तीची मदत घेता येईल. पती-पत्नीमधील दुरावा कमी होईल.
कन्या -आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी. विचारांना चालना मिळेल. प्रवास जपून करावा. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तूळ – सर्वांशी सुसंवाद राहील. आपल्या वेळेचा सदुपयोग करावा. प्रकृतीत सुधारणा होईल. नम्रता सोडू नये. वाटाघाटीचा प्रश्न सोडवाल.
वृश्चिक – अडचणींवर मात करू शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. भावनावश न होता धंद्यात चर्चा करा.
धनु – व्यवसायात क्षुल्लक अडचण येईल. कामात चालढकलपणा करू नका. नम्रपणे बोला. यश मिळेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल.
मकर -इतरांना मदत करावी लागेल. वस्तू नीट सांभाळा. नोकरीत प्रतिष्ठा प्राप्त होईल. अरेरावी करू नका. जोडीदाराच्या मताचा आदर करावा.
कुंभ – तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
मीन -पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. स्पर्धेत प्रगती कराल.