Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार,११ जून २०२१

राशीभविष्य : शुक्रवार,११ जून २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : महत्त्वाची गाठ-भेट आजच करून घ्या. खाण्याची चंगळ होईल. आप्तेष्ठांना मदत करावी लागेल.

वृषभ : जुना वाद काढू नका. समोरची व्यक्ती तुम्हाला कमी लेखण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल.

- Advertisement -

मिथुन : धंद्यात वाढ होईल. खर्चही वाढू शकतो. नवीन ओळखीवर जास्त विश्वास ठेवू नका.

कर्क : गुप्त कारवायांना ओळखा, म्हणजे योग्य उपाय नंतर करता येईल. अहंकाराने वागू नका. मारामारी करू नका.

- Advertisement -

सिंह : तुमचा आत्मविश्वास वाढेल. घर घेण्याचा विचार पूर्णत्वास जाऊ शकेल. स्पर्धेत प्रगती होईल.

कन्या : धंद्यात फायदा होईल. तुमचा विचार इतरांना पटल्याने समस्या लवकर सोडवता येईल.

तूळ : जिद्द ठेवा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. मोठी खरेदी कराल.

वृश्चिक : मोठ्या लोकांची काळजी घ्यावी लागेल. कामात लक्ष द्या. चूक होईल. हिशोब नीट तपासून घ्या.

धनु : आजचे काम व्यवस्थित पूर्ण करता येईल. शेजारी मदत करतील. मनाप्रमाणे निर्णय घेता येईल.

मकर : विरोध मोडून काढता येईल. गुप्त शत्रू मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. गुपित शोधून काढता येईल.

कुंभ : तुमच्या धंद्यात चांगला जम बसेल. नवीन लोक येतील. विचारांना चालना मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.

मीन : कामे वाढतील. फायदा मिळेल. संताप कमी करा. पदाधिकार मिळेल. वाहन जपून चालवा. चूक होऊ शकते.

- Advertisement -