राशीभविष्य: शुक्रवार १७ जून २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : उत्साहवर्धक घटना घडेल. लोकप्रियता वाढेल. स्पर्धेत जिंकाल. घरातील वाद मिटेल.

वृषभ : कला क्षेत्रात नावलौकीकात भर पडेल. जुने स्नेही भेटतील. जमिनीसंबंधी काम करून घ्या.

मिथुन : नोकरी-धंद्यात प्रगती होईल. प्रेमाला चालना मिळेल. कठीण काम करून घ्या.

कर्क : नावलौकिक वाढेल. कला क्षेत्रात विशेष कल्पना सुचेल. घरातील समस्या कमी करता येईल.

सिंह : महत्त्वाच्या लोकांच्या बरोबर भेट घेता येईल. तुमचे विचार मान्य होतील. मैत्री वाढेल.

कन्या : क्षुल्लक वाद सुद्धा वाढू शकतो. सावध रहा. रस्त्याने चालताना चौफेर लक्ष द्या.

तुला : मन-शरीर उल्हासित होईल. मित्र परिवाराची भेट होईल. खरेदी-विक्रीत फायदा होईल.

वृश्चिक : विचारवंतांच्या सहवासाने नवा विषय समजून घेता येईल. ज्ञानात भर पडेल. प्रतिष्ठा मिळेल.

धनु : दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. मैत्री वाढेल. महत्त्वाचे कठीण वाटणारे काम करून घ्या.

मकर : आर्थिक फायद्याची वेगळ्याच प्रकारची संधी समोर येईल. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल.

कुंभ : कुटुंबात महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा होईल. संवाद साधला जाईल. धंद्यात वाढ होईल.

मीन : तुमच्या प्रगतीवर इतरांचा डोळा राहील. तुम्हाला अपमानास्पद शब्द ऐकावे लागतील. संयम ठेवा.