Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार १५ नोव्हेंबर २०२४

राशीभविष्य : शुक्रवार १५ नोव्हेंबर २०२४

Subscribe

मेष – आपल्या कार्याला योग्य प्रतिसाद मिळेल. जवळच्या व्यक्तीच्या मनातील गैरसमज वेळच्या वेळी दूर करा. धंदा वाढेल.
वृषभ – तुम्ही ठरवलेले काम पूर्ण करता येईल. अडचण दूर करण्यास मदत करणारे मिळतील. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत.
मिथुन – प्रवासात घाई करू नका. कायद्याचे पालन करा. संततीशी निगडित अडीअडचणी सोडवू शकाल. समाधान लाभेल.
कर्क – मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल. काही काळ मन अस्थिर राहील. महत्त्वाच्या कामाचा पाठपुरावा करू शकाल.
सिंह – गोड बोलून तुमच्या मनातील विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मौल्यवान खरेदी सावधपणे करा. गृहसौख्य लाभेल.
कन्या – मैत्रीत अधिक जवळीक होईल. मोहाला बळी पडू नका. ठरवलेले काम पूर्ण करता येईल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
तूळ – तुमच्या कामात एखादी चूक होऊ शकते. डोके शांत ठेवा. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात.
वृश्चिक – महत्त्वाकांक्षी योजनांची आखणी कराल. तुमच्या मनावरील दडपण कमी होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. खरेदी कराल.
धनु – अपेक्षित व्यक्ती भेटल्यामुळे वेळ फुकट जाणार नाही. स्पर्धा जिंकाल. स्थावर मालमत्तेशी निगडित प्रश्न सोडवू शकाल.
मकर – विचारपूर्वक निर्णय घेता येईल. मोठ्या लोकांच्या ओळखीमुळे अडलेले काम पूर्ण करता येईल. अनावश्यक खर्च टाळावा.
कुंभ – कायद्याच्या कक्षेत राहून आपणास काम मिळेल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. धंद्यात वृद्धी होईल. वेळेला महत्त्व द्यावे.
मीन – आजचे काम उद्यावर टाकू नका. स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. भावंडांशी मिळतेजुळते घ्यावे. कल्पकतेला वाव मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -