राशीभविष्यः शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- आनंद व उत्साह वाढेल. ध्येयपूर्ति होईल. प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभेल. कलावतांना विशेष काम मिळेल.

वृषभ :- धंद्यात तेजी येईल. भागीदाराबरोबर एकमत होईल. मोठी खरेदी कराल.

मिथुन :- उत्साहाच्या भरात कठीण काम करून दाखवाल. नोकरांची कमी भरून निघेल. धंदा वाढेल.

कर्क :- वाद व तणाव वाढण्याची शक्यता आहे. दुखापत संभवते. वाहन जपून चालवा.

सिंह :- तुमच्या मुद्याचा सर्व जण स्विकार करतील. जुने येेणे वसूल करा. प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात लक्ष द्या.

कन्या :- नोकरीतील तणाव कमी होईल. नवीन ओळख होईल. धंद्यातील त्रुटी लक्षात येतील.

तूळ :- संतती संबंधी मोठा निर्णय घेता येईल. प्रवासाचा बेत ठरवाल. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाढ होईल.

वृश्चिक :- प्रवासात सावध रहा. खाण्यापिण्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. मतभेद वाढवू नका.

धनु :- जीवनसाथीशी संवाद साधता येईल. गुंतवणूक वाढेल. कठीण समस्येवर तोडगा काढता येईल.

मकर :- तिरसट बोलण्यामुळे गैरसमज वाढेल. अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता आहे. राग वाढेल.

कुंभ :- संततीच्या भविष्याचा विचार कराल. प्रवासाचा बेत ठरवाल. मोठी खरेदी करण्याचा इरादा पूर्ण होईल.

मीन :- अपेक्षीत व्यक्ती भेटेल. जुना वाद मिटवता येईल. शेअर्समध्ये गुंतवणूक वाढेल. घरगुती तणाव कमी होईल.