Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार २२ नोव्हेंबर २०२४

राशीभविष्य : शुक्रवार २२ नोव्हेंबर २०२४

Subscribe

मेष – व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. मित्र आपल्या कामाला येतील.
वृषभ – नोकरीत क्षुल्लक तणाव निर्माण होईल. आपला आत्मविश्वास वाढेल. वाहन जपून चालवा. मोठे निर्णय घेऊ शकाल.
मिथुन – आपल्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. नवीन कामांचा पाठपुरावा करावा.
कर्क – शक्यतो कठोर शब्दांत बोलू नका. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. कौटुंबिक सौख्य जाणवेल.
सिंह – आपल्या स्वभावातील खंबीरपणा दिसेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात तडजोड करावी लागेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये.
कन्या – तुमचा विचार इतरांना पटवणे अडचणीचे ठरू शकते. सर्वांशी प्रेमाने वागावे. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत.
तूळ – नोकरदारांनी सावधपणे निर्णय घ्यावेत. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा कराल. वरिष्ठांची मर्जी राखावी. अपेक्षित कामे होतील.
वृश्चिक – वरिष्ठांशी सलोखा राहील. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. जुने गैरसमज असल्यास ते मिटवण्याकडे कल ठेवावा. खर्च वाढेल.
धनु – आर्थिक विवंचना कमी होतील. वादविवाद टाळावेत. तुमचा आत्मविश्वास वाढेल. अंदाज बरोबर येईल. महत्त्वाचा निर्णय घ्या.
मकर – फायदा होणारे काम मिळेल. तुमचा राग वाढू देऊ नका. थकबाकी वसूल कराल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
कुंभ – विचारांना चालना मिळेल. स्पर्धा जिंकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.
मीन – मुलांशी निगडित चांगली वार्ता समजेल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. कर्तव्याचे पालन करा. धंद्यात लाभ होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -