Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्यः शुक्रवार ३ सप्टेंबर २०२१

राशीभविष्यः शुक्रवार ३ सप्टेंबर २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :- यश-अपयशाचे नानाविध विचार मनात येतील. उदास वाटेल. भविष्याची चिंता कराल.

वृषभ:- आशेचा किरण दिसेल. धंद्यात लाभ होईल. मित्र-परिवारात वाढ होईल.

- Advertisement -

मिथुन:- खरेदी करण्याचा उत्साह राहील. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. प्रवासात आनंद मिळेल.

कर्क :- मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल. प्रेम प्रकरणात मनाप्रमाणे घटना घडतील. जुने येणे वसूल करा.

- Advertisement -

सिंह :- धंद्यात लाभ होईल. प्रकृतीची तक्रार जाणवेल. पित्ताचा त्रास संभवतो. प्रवासात खर्च होईल.

कन्या :- जीवनसाथीच्या सहाय्यामुळे मोठा प्रगतीचा पल्ला गाठता येईल. प्रेमाच्या व्यक्तीची भेट होईल.

तुला :- गैरसमज संभवतो. हिशोब करताना काळजी घ्या. जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. कायदा सांभाळा.

वृश्चिक :- प्रवासाचा आनंद मिळेल. खाण्यापिण्याची चंगळ होईल. व्यवसायात लाभ होईल. नवीन परिचय होईल.

धनु :- आप्तेष्टांच्या मदतीला जावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. जमिनीच्या व्यवहाराची चर्चा सफल होईल.

मकर :- करारीपणाने एखादा निर्णय घेऊन टाकाल. प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात लक्ष घालावे लागेल.

कुंभ :- व्यवसायातील अडचणी कमी करता येतील. व्यापक दृष्टीकोन ठेवल्यास फायदा होईल. नवीन परिचय होईल.

मीन :- एखाद्या प्रश्नाच्या सीमारेषेवर तुम्ही आहात असे वाटेल. मनाची द्विधा अवस्था होईल. खर्च वाढेल.

- Advertisement -