राशीभविष्य: सोमवार ०६ मार्च २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- आजचा दिवस विचार करण्यात जाईल. आत्मविश्वास वाढेल. दुपारनंतर दिशा मिळेल. युक्ती सुचेल.

वृषभ ः- तुमची योग्य व्यक्तीशी भेट झाल्याने मनावरील ताण हलका होईल. धंद्यात वाढ होईल.

मिथुन ः- तुम्ही यशस्वीपणे काम कराल. मोठेपणा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. मित्र स्वार्थीपणा करेल.

कर्क ः- अरेरावी न करता बोलणी करा. यश मिळेल. गोड बोलून तुमची कामे करून घ्या.

सिंह ः- ताण-तणाव होईल. तुमचे मुद्दे अवास्तव वाटतील. जुने स्नेही भेटतील. मुलांची प्रगती होईल.

कन्या ः- सकाळी महत्त्वाचे काम करा. चर्चा यशस्वी होईल. जुने येणे वसूल करा. धंदा वाढेल.

तूळ ः- स्पर्धेत जिंकाल. नवे परिचय होतील. महत्त्वाची वस्तू जागेवर ठेवा. कामाचा व्याप पूर्ण कराल.

वृश्चिक ः- तुमचे डावपेच बरोबर ठरतील. मैत्रीनेच समस्या सोडवता येईल. गुप्त कारवायांना महत्त्व देऊ नका.

धनु ः- धावपळ होईल. प्रकृतीची काळजी घ्या. जवळच्या व्यक्तीची चिंता वाटेल. दुखापत संभवते.

मकर ः- आजचे काम आजच करा. वाटाघाटीत यश मिळेल. तुमचे मुद्दे मांडता येतील. धंदा सोडू नका.

कुंभ ः- तणाव होईल. पोटाची काळजी घ्या. खरेदी करताना पाकीट सांभाळा. रस्त्याने नीट चाला.

मीन ः- आजचे काम लवकरच करून घ्या. फायदा होईल असा धंदा करा. मान-प्रतिष्ठा मिळेल.