राशीभविष्य: सोमवार ११ जुलै २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : मनावर दडपण येईल. तुमचे डावपेच उघड होऊ शकतात. गुपित समजल्यामुळे तणाव होईल.

वृषभ : नाराजी दूर करता येईल. मोठी खरेदी कराल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. समस्या संपवा.

मिथुन : कार्याला दिशा मिळेल. धंद्यात फायदा होईल. जुने मित्र भेटतील. तुमच्या क्षेत्रात चमकाल.

कर्क : योग्य निर्णय घेता येईल. मुलांची प्रगती पाहून खूश व्हाल. परदेशात जाण्याचा योग येईल.

सिंह : धंद्यात मागे राहू नका. महत्त्वाची कामे करून घ्या. कोर्टकेस सोपी समजू नका.

कन्या : आजचे काम उद्यावर टाकू नका. कठीण समस्या सोडवता येईल. वाटाघाटीत यश मिळेल.

तुला : तुमच्या कार्यातील अडचणीवर मात करता येईल. प्रकृतीची काळजी घ्या. वस्तू सांभाळा.

वृश्चिक : धंदा मोठा होईल. थोरांचे सहकार्य घेता येईल. मागील येणे वसूल करा. स्पर्धा जिंकाल.

धनु : धंद्यात फायदा होईल. क्षुल्लक कारणाने मन उदास होईल. कागदपत्र नीट ठेवा.

मकर : आजच महत्त्वाचे काम करा. स्नेही भेटतील. मुले आनंद देतील. धंदा वाढेल.

कुंभ : मन अस्थिर होईल. दुसर्‍याचे काम करावे लागेल. खर्च करावा लागेल. निराश वाटेल.

मीन : आळस न करता सर्व कामे वेळच्या वेळी पूर्ण करा. आवडते पदार्थ सेवनास मिळतील.