घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार 13 नोव्हेंबर 2023

राशीभविष्य : सोमवार 13 नोव्हेंबर 2023

Subscribe

मेष : घरातील व्यक्तींना खूश करता येईल. त्यांची मदत तुम्हाला मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणात महत्त्वाची चर्चा करा.

वृषभ : किरकोळ कारणाने काम रेंगाळण्याची शक्यता आहे. धावपळ होईल. शेजारी तुमच्यावर निष्कारण आरोप टाकेल.

- Advertisement -

मिथुन : तुमचा प्रभाव सर्व कामात पडेल. कठीण वाटणारे काम करून घ्या. थकबाकी वसूल करा. धंद्यात वाढ होईल.

कर्क : चांगली बातमी तुम्हाला प्रेरणा देणारी ठरू शकते. धंद्यात संयमाने वागा. मोठे काम मिळवता येईल. प्रवास कराल.

- Advertisement -

सिंह : तुमच्या शब्दावर लोक विश्वास ठेवतील. धंद्यात काम मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. वसुली करता येईल.

कन्या : घरात झालेला गैरसमज दूर करता येईल. खाण्याची काळजी घ्या. नवीन ओळख होईल. व्यवहारात सावध रहा.

तूळ : मनाची द्विधा अवस्था होईल. महत्त्वाचे काम करून घ्या. प्रेमाची माणसे भेटतील. कला क्षेत्रात मन रमेल. चर्चा कराल.

वृश्चिक : तुमचा उत्साह कमी पडू शकतो. इतरांचे बोलणे ऐकून घ्यावे लागेल. पाहुण्यांच्यासाठी वेळ, पैसा खर्च होईल.

धनु : ठरविलेले काम वेळेत पूर्ण करता येईल. मोठ्या लोकांची भेट घेता येईल. महत्त्वाचा निर्णय घेऊन पुढील चर्चा करता येईल.

मकर : महत्त्वाचा प्रश्न सोडवता येईल. धंद्यात वाढ होईल. ओळखी वाढतील. योजनाबद्ध कार्य करा. यश मिळेल. प्रतिष्ठा मिळेल.

कुंभ : ताण-तणाव कमी होईल. धंद्यात सुधारणा करता येईल. मित्र-परिवाराची भेट होईल. थकबाकी वसूल करा.

मीन : रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. अपमानास्पद शब्द ऐकावा लागेल. शांत डोक्याने प्रश्न सोडवा. मैत्री वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -