Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार १८ नोव्हेंबर २०२४

राशीभविष्य : सोमवार १८ नोव्हेंबर २०२४

Subscribe

मेष – विरोधात गेलेले लोक परत तुमचेच कौतुक करतील. धंद्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ – महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. प्रवासात घाई करू नका. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
मिथुन – घरातील समस्या सोडवता येतील. किरकोळ कारणाने तणाव होऊ शकतो. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा आपणास लाभ होईल.
कर्क – कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
सिंह – व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. घरातील व्यक्तीबरोबर क्षुल्लक मतभेद होतील. आपण एखादा धाडसी निर्णय घ्याल.
कन्या – वाटाघाटी यशस्वी होतील. आपला राग आवरावा. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. शक्यतो अनावश्यक खर्च टाळावा.
तूळ – कोर्ट केसमध्ये यशस्वी व्हाल. महत्त्वाची स्पर्धा जिंकाल. महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. आर्थिक नियोजन जपून करावे.
वृश्चिक – व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. धंद्यात वाढ होईल. मैत्रीत वाद उद्भवू शकतो. प्रकृतीची काळजी घ्यावी.
धनु – खंबीरपणे समस्या सोडवाल. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. नोकरीत वरिष्ठ शाबासकी देतील. अधिकारांचा अतिरेक करू नका.
मकर – ठरवलेल्या कामात क्षुल्लक अडचण येऊ शकते. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील.
कुंभ – प्रयत्न आणि नशिबाच्या साथीने कठीण काम पूर्ण कराल. प्रेमाला चालना मिळेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल.
मीन – कोर्टाच्या कामात नम्रता ठेवा. यश मिळेल. सहकार्‍यांशी सलोख्याने वागावे. प्रवासाचे योग संभवतात. वाणीवर नियंत्रण ठेवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -