मेष – कला क्षेत्रात प्रगती होईल. कामात उतावीळपणा करून चालणार नाही. प्रेमाच्या माणसांची भेट होईल. मित्र मदत करतील.
वृषभ -विचारांना चालना देणारी घटना घडेल. तुमच्या मनावरील ताण कमी होईल. आपला उत्साह वाढेल. परिस्थितीशी जुळवून घ्याल.
मिथुन – काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. गोड बोलण्यावर भर द्यावा. मुलांच्या यशाचे स्वप्न पाहाल. मान-प्रतिष्ठा मिळेल.
कर्क – हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामात समाधानी राहाल. प्रवासात अडचण येऊ शकते. धंद्यात खर्च वाढू शकतो.
सिंह – जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. कामात किरकोळ अडचणी येऊ शकतात. नम्रता ठेवा व प्रेमाने वागा. आरोग्यात सुधारणा होईल.
कन्या – घरातील वातावरण प्रसन्न असेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होतील. प्रलोभनाला बळी पडू नका. नातेवाईक भेटतील.
तूळ -धंद्यात खूशखबर मिळेल. नातलगांच्या मदतीला जाल. काही अपवाद नजरेआड करावे लागतील. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल.
वृश्चिक – उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. मुलांच्या आनंदाने खूश व्हाल. वादविवाद टाळता येईल. छंद जोपासायला वेळ काढाल.
धनु – अपेक्षित व्यक्तीची भेट घडेल. आजचे काम आजच करा. भावंडांचा विरोध होऊ शकतो. आपल्या आवडत्या कामासाठी वेळ मिळेल.
मकर – धंद्यात मोठे काम मिळेल. तुमची समस्या सोडवण्याचा नवा मार्ग मिळेल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. चिकाटीने कामे कराल.
कुंभ – व्यवसायात चांगला फायदा होईल. थकबाकी वसूल कराल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. कल्पना कृतीत उतरवता येईल.
मीन – स्थावरची कामे मार्गी लागतील. काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. आप्तेष्टांच्या भेटीमुळे उत्साह वाढेल. नवे मित्र भेटतील.
Horoscope : सोमवार, 2 डिसेंबर 2024
written By My Mahanagar Team
Mumbai