राशीभविष्य: सोमवार २५ एप्रिल २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- तटस्थ भूमिका घ्या. इतरांना बोलू द्या. तुम्हाला संधी मिळेल. तेव्हाच तुमचे विचार मांडा.

वृषभ :- कलाटणी देणारी घटना घडेल. मोठे यश मिळवाल. व्यवसायात चांगले काम मिळेल. स्पर्धा जिंकाल.

मिथुन :- ठरविलेली योजना पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल. धंद्यात नवा फंडा फायदेशीर ठरेल. पद मिळेल.

कर्क :- सामोपचाराने वागून तुमचे हित साधण्याचा प्रयत्न करा. तुमची प्रतिष्ठा सांभाळा. राग आवरा.

सिंह :- तुमच्या बोलण्यातून गैर अर्थ काढला जाईल. रागाच्या भरात संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

कन्या :- महत्त्वाच्या कामावर लक्ष द्या. कोर्टकेस यशस्वी होईल. धंदा वाढेल. थकबाकी मिळवा.

तूळ :- तुमचा वचक दिसल्याने त्रास देणारे कमी होतील. प्रेमाने प्रश्न सोडवा. धंद्यात वाढ होईल.

वृश्चिक :- दुसर्‍याचा अपमान करू नका. स्वतःचा अपमान लक्षात ठेवा. प्रसंगावधान उपयोगी पडेल.

धनु :- वाहनापासून धोका संभवतो. प्रकृती अस्थिर होऊ शकते. नातलगांची मदत मिळू शकेल.

मकर :- घरगुती वाद मिटवा. तुमच्या समोर अहंकार दाखवल्यामुळे तुमचा संताप होईल. कायदा पाळा.

कुंभ :- शेजारी निष्कारण कुरबुर करतील. तुमच्या कामात अडचण येऊ शकते. वाद वाढवू नका.

मीन :- आजच महत्त्वाचे काम करून घ्या. प्रेरणा देणारी घटना घडेल. आप्तेष्ट भेटतील.