राशीभविष्य: सोमवार, ०४ एप्रिल २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- विरुद्धलिंगी व्यक्ती तुमची योग्य मदत करेल. मैत्री वाढेल. स्पर्धेत जिंकाल. धंदा वाढेल.

वृषभ :- तुम्हाला पटवून देताना जास्त मेहनत घ्यावी लागेल. डोळ्यांची काळजी घ्या. वस्तू नीट ठेवा.

मिथुन :- मुलांच्या संबंधी चांगली खबर मिळेल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. वाहन जपून चालवा.

कर्क :- विरोधकांना कसे जिंकायचे याचा विचार करा. मोठ्या माणसांचा सल्ला घ्या. प्रवास सुखकारक होईल.

सिंह :- तुमचा आत्मविश्वास वाढेल. उत्साहाच्या भरात कठीण काम करून घेता येईल. मैत्री कराल.

कन्या :- धंद्यात वाढ होईल. वाटाघाटीत यश मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. जुना वाद मिटवता येईल.

तूळ :- मनाची द्विधा अवस्था होईल. भावनांना आवर घाला. मौल्यवान वस्तू नीट ठेवा.

वृश्चिक :- तुमची कामे वेळच्यावेळी करा. वाहन नीट चालवा. रागाचा पारा वाढेल.

धनु :- प्रकृतीत सुधारणा होईल. गैरसमज दूर करू शकाल. मान-प्रतिष्ठा मिळेल. भिडस्तपणा ठेऊ नका.

मकर :- विचारांना चालना मिळेल. लोकांचा अनुभव घ्याल. तुमच्या मुद्यावर तुम्ही ठाम राहू शकाल.

कुंभ :- तुमच्याबद्दलचा गैरसमज इतर लोक दूर करतील. दिलगिरी व्यक्त करतील. तुमचा प्रश्न सुटेल.

मीन :- कामात चूक होण्याची शक्यता आहे. सावध रहा. प्रवासात सावध रहा. कायद्यात रहा.