Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य: सोमवार, १५ फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य: सोमवार, १५ फेब्रुवारी २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : राहून गेलेले काम करता येईल. व्यवसायात जम बसवा. वसुली करता येईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल.

वृषभ : कोणतेही काम करताना सावधगिरी बाळगा. दुखापत होऊ शकते. धंद्यात दुर्लक्ष करू नका.

- Advertisement -

मिथुन : प्रेमाला चालना मिळेल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. राजकारणात तुमचे वर्चस्व वाढेल. स्पर्धा जिंकाल.

कर्क : विरोधक तुमच्या उणिवेचा फायदा उठवतील. वाद करतील. घरातील वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ होईल.

- Advertisement -

सिंह : सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. भावनेच्या आहारी जाऊन राजकारणात निर्णय घेऊन चालणार नाही. समतोल ठेवा.

कन्या : प्रवासात वस्तू सांभाळा. वाद करू नका. दुखापत होऊ शकते. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मुले मदत करतील.

तूळ : आत्मविश्वास, उत्साह वाढेल. मैत्रीत वाहवत जाऊ नका. कल्पनाशक्तिला चालना मिळेल. कलाक्षेत्रात मन रमेल.

वृश्चिक : धंद्यातील समस्या कमी होईल. ओळखी वाढतील. थकबाकी वसूल करता येईल. गैरसमज दूर करा.

धनु : तुमच्या कार्याचे कौतुक होईल. नोकरी शोधता येईल. प्रेमाला चालना मिळेल. महत्वाचा निर्णय घेता येईल.

मकर : फटकळपणे बोलणे टाळा. मोठा तणाव होऊ शकतो. प्रवासात घाई करू नका. घरातील व्यक्ती मदत करतील.

कुंभ : धंद्यात वाढ होईल. मागील येणे वसूल कराल. मौल्यवान खरेदी कराल. मौज-मजा कराल. स्पर्धेत चमकाल.

मीन : जिद्दीने यश खेचता येईल. साहित्याला नवा विषय मिळेल. घरातील लोकांची नाराजी दूर करता येईल.

- Advertisement -